पिंपरीत वाहनाने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:23 IST2019-06-11T19:22:37+5:302019-06-11T19:23:11+5:30
रावेत येथे २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता झाला होता.

पिंपरीत वाहनाने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू
पिंपरी : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. हा अपघात मुंबई बेंगलुरु महामार्गावरील रावेत येथे सेन्टोसा रिसॉर्टसमोर, रावेत येथे २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता झाला होता. सरदार विलास पोवार (वय ४७, रा. पुनाळ ता. पन्हाळा, जि. कोल्हापुर) असे मयत पादचाºयाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वसीम महंमद शेख यांनी सोमवार (दि. १०) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सरदार पोवार हे रावेत येथील सेन्टोसा रिसॉर्टसमोरील रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सरदार यांचा मृत्यू झाला. देहुरोड पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.