नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आडगाव शिवारातील विंचूर दळवी येथे दुचाकीवरून जाताना दुचाकी गतिरोधकावरून आदळून गंभीर जखमी झालेल्या आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पांडुरंग भालेराव (55) यांचे मंगळवारी (दि.30) मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. भालेराव यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.आडगाव पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस हवालदार म्हणून भालेराव कार्यरत होते. गेल्या सोमवारी (दि.29) भालेराव यांना लोकसभा निवडणूकीचा विंचूर दळवी येथे बंदोबस्त होता. सोमवारी सकाळी सहा वाजता भालेराव दुचाकीवरून जात असताना नवजीवन पब्लिक स्कूलजवळ दुचाकी गतिरोधकावरून आदळली त्यात भालेराव यांच्या डोक्यात असलेले हेल्मेट फुटून डोक्याला गंभीर मार लागल्यानेत्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना काल मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.भालेराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भालेराव यांचा लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जाताना अपघात होऊन मृत्यू झाल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 14:06 IST
भालेराव यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पांडुरंग भालेराव (55) यांचे मंगळवारी (दि.30) मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले.आडगाव पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस हवालदार म्हणून भालेराव कार्यरत होते.