शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उपासनगर येथील अपघातात वास्कोतील हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 20:42 IST

शनिवारी पहाटे ६.२० च्या सुमारास हा अपघात घडला.

ठळक मुद्देखारीवाडा, वास्को येथून मासे घेऊन जात असलेल्या रिक्षाने राजेशकुमार यांना धडक दिल्याने ते गंभीररित्या जखमी झाले अपघातात सामील असलेली रिक्षा जप्त करण्यात आली

वास्को - गोव्यातील वास्को शहरातला नामावंत हॉटेल व्यवसायिक राजेशकुमार हलवाई शनिवारी  पहाटे ‘मॉर्निंग वॉक’ साठी गेले असता वेर्णा महामार्गावर त्यांना मालवाहू रिक्षाने धडक देऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. खारीवाडा, वास्को येथून मासे घेऊन जात असलेल्या रिक्षाने राजेशकुमार यांना धडक दिल्याने ते गंभीररित्या जखमी झाले असून नंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे ६.२० च्या सुमारास हा अपघात घडला. वास्कोत असलेल्या ‘न्यू बनारसी डेरी अ‍ॅण्ड रेस्ट्रोरंण्ट’ चे राजेशकुमार मालक असून नेहमीप्रमाणे शनिवारी ते ‘मॉर्निंग वॉक’ साठी आपल्या घरातून निघाले होते. जेव्हा ते उपासनगर येथील महामार्ग रस्त्यावर पोचले तेव्हा त्यांना मासे घेऊन जाणाऱ्या मालवाहू रिक्षा (क्र. जीए ०२ एन ०९४०) ने जबर धडक दिली. यामुळे राजेशकुमार रस्त्यावर फेकले जाऊन यात ते गंभीर रित्या जखमी झाले. ह्या अपघाताची माहीती मिळताच १०८ रुग्णवाहीकेने त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन त्यांना उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. येथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत राजेशकुमार हे ५२ वर्षाचे असून ते उपासनगर, वेर्णा भागात राहत असल्याची माहीती पोलीसांनी दिली.अपघाताची माहीती मिळताच पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन ह्या अपघाताचा पंचनामा केला. तसेच अपघातात सामील असलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून खारीवाडा, वास्को येथील रिक्षा चालक सुभाष राथोड (मूळ रा. बागलकोट कर्नाटक) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. पोलीस हवालदार नेवील फर्नांडीस यांनी अपघाताचा पंचनामा केला असून वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूauto rickshawऑटो रिक्षाArrestअटकPoliceपोलिस