पुणे : मालमत्तेसाठी मुलीनेच पुण्याहून अहमदाबाद येथे नेताना आजारी आईस झोपेच्या गोळ्याचा ओव्हर डोस दिला़ त्यामुळे आईचा मृत्यु झाला़. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आईच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीवर गुन्हा दाखल केला आहे़.प्रफुल्ला ऊर्फ दिव्या सुनिल शहा (वय ४८, रा़ सागर को ऑप सोसायटी, सिनिगॉन स्ट्रिट, कॅम्प) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलीचे नाव आहे़. याप्रकरणी तिचा भाऊ आनंद श्रावणकुमार पटेल (वय ४५, रा़. शुक्रवार पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आनंद पटेल आणि दिव्या शहा हे भाऊ बहीण आहेत़. त्यांची आई शारदाबेन पटेल या आजारी पडून त्यांना त्रास होऊ लागल्याने दिव्या शहा यांनी त्यांना १८ ऑगस्ट रोजी जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते़. त्यांना भेटण्यास नातेवाईकांना तसेच आनंद पटेल यांना मज्जाव केला होता़. तेथे उपचार घेत असताना शारदाबेन पटेल यांचा २२ ऑगस्ट रोजी हॉस्पिटलमधून डिसचॉर्ज घेतला़. त्यांना वाहनाने अहमदाबाद येथे नेऊन २३ ऑगस्टला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले़. त्याचदिवशी त्यांचे तेथे निधन झाले़. आईकडील ६० लाख रुपये व प्रॉपर्टीमधील शेअर्स बळकाविण्याच्या उद्देशाने शहा यांनी त्यांना प्रवासादरम्यान आईला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस दिल्याने त्यांचे निधनास कारणीभूत झाल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे़.
मालमत्तेसाठी मुलीने आईला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस दिल्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 15:22 IST
मुलाचा आपल्याच बहिणीवर आरोप..
मालमत्तेसाठी मुलीने आईला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस दिल्याने मृत्यू
ठळक मुद्देयाप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आईच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीवर गुन्हा दाखल