The death of the autorickshaw driver due to collapses part of the under construction building | बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू 
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू 

ठळक मुद्देया दुर्घटनेतील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.मोटरसायकलवरुन जाणारी व्यक्ती जखमी झाली.जखमी इसमास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.या रिक्षेच्या बाजूला एक मोटारसायकल देखील होती. या दुर्घटनेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई - धारावी येथील पीएमजीपी कॉलनीमध्ये एका बांधकाम इमारतीचा भाग कोसळला. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. कंत्राटदाराच्या बेजाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दखल घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले.

या इमारतीच्या बाजूने एक रिक्षा जात होती. तेवढ्यात इमारतीचा काही भाग त्या रिक्षावर कोसळला. या रिक्षेच्या बाजूला एक मोटारसायकल देखील होती. या दुर्घटनेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकलवरुन जाणारी व्यक्ती जखमी झाली.जखमी इसमास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


Web Title: The death of the autorickshaw driver due to collapses part of the under construction building
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.