मारहाण झाल्याने हर्सुल कारागृहातील आरोपीचा मृत्यू, नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:04 IST2019-01-20T07:39:22+5:302019-01-20T13:04:22+5:30

हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला .योगेश रोहिदास राठोड(२९, भारंबा तांडा  ता.कन्नड. हल्ली मुक्काम कृष्णा ईश्वर कॉलनी मयूरपार्क, औरंगाबाद ) असे मयताची नाव आहे.

Death of accused in Horsul Jail | मारहाण झाल्याने हर्सुल कारागृहातील आरोपीचा मृत्यू, नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

मारहाण झाल्याने हर्सुल कारागृहातील आरोपीचा मृत्यू, नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला .योगेश रोहिदास राठोड(२९, भारंबा तांडा  ता.कन्नड. हल्ली मुक्काम कृष्णा ईश्वर कॉलनी मयूरपार्क, औरंगाबाद ) असे मयताची नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,योगेश राठोड हा मिस्त्री काम काम करतो त्याच्या विरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात 2015मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते . १७ जानेवारी रोजी हर्सूल पोलिसांनी योगेशला अटक करुन  न्यायालयात हजर केले होते. त्याची जामीन घेण्यासाठी कुणीच न आल्याने त्याला न्यायालयाने कारागृहात  पाठवले. वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी त्याला जेलच्या ताब्यात सायंकाळी सात वाजता दिले होते .त्यानंतर मध्यरात्री दीड वाजता कारागृह पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. योगेश राठोडला प्रचंड मारहाण करण्यात आल्याने तो बेशुद्ध झाला होता .त्याच्यावर घाटी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याच्या हातावर  ,पाठीवर, पायाभर आणि पोटात मारहाणीच्या खूणा स्पष्टपणे दिसत होत्या . आय सी यू मध्ये उपचार सुरू असताना शनिवारी रात्री  त्याची प्राणज्योत मालवली.

कारागृह पोलिसावर खूनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी
  कारागृहातील  पोलिसांनी योगेशला बेदम  मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी योगेशचा भाउ सचिनने  केली. योगेशचा मृत्यू झाल्याचे कळताच जवळपास पाचशे हुन अधिक  नातेवाईक घाटीत जमा झाले होते. जोपर्यंत दोषीवर  गुन्हे दाखल होत नाही आणि त्याना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता .घटनेची माहिती मिळताच तातडीने घाटी रुग्णालयात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे , गोवर्धन कोळेकर ,गुणाजी सावंत बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता.

Web Title: Death of accused in Horsul Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.