५० हजारांपायी गमावला जीव, बाल्कनीतून पळ काढताना कास्टिंग एजंटचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 14:19 IST2018-10-12T14:18:37+5:302018-10-12T14:19:28+5:30
घरातून पळून जाण्यासाठी मिश्राने बाल्कनीतून उडी टाकत असताना त्याचा खाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील पैशाच्या व्यवहाराबद्दल पोलीस चौकशी करीत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले.

५० हजारांपायी गमावला जीव, बाल्कनीतून पळ काढताना कास्टिंग एजंटचा अपघाती मृत्यू
वसई - वसईत बाल्कनीतून पलायन करताना उडी मारली असताना खाली पडून कास्टिंग एजंट मरण पावल्याची घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. मरण पावलेल्या कास्टिंग एजंटचे नाव सत्यम मिश्रा (वय २५) असं असून वसईतील वालीव अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. मिश्रा हा कास्टिंग एजंटचे काम करत असल्याने चित्रपटात येण्यासाठी त्याने एका क्लाइंटकडून ५० हजार रुपये घेतले होते. परंतु काम न झाल्याने क्लाइंटने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु त्याने ५० हजार रुपये देण्यास नकार दिल्याने क्लाइंट पैसे मागण्यासाठी घरी आले होते. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला व मिश्रा याला मारहाण करण्यात आली. घरातून पळून जाण्यासाठी मिश्राने बाल्कनीतून उडी टाकत असताना त्याचा खाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील पैशाच्या व्यवहाराबद्दल पोलीस चौकशी करीत असल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले.