शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

"नीता भाभी आणि मुकेश भैय्या; हा केवळ ट्रेलर, पुढच्यावेळी.…’’ त्या कारमधील पत्रातून दिली अशी धमकी

By बाळकृष्ण परब | Updated: February 26, 2021 11:19 IST

''Dear Nita Bhabhi and Mukesh Bhaiya; It's just a trailer, next time. threaten to Ambani family in The letter : स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमधून एक पत्रही जप्त करण्यात आले असून, या पत्रामधून मुकेश आंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमधून एक पत्रही जप्त करण्यात आले असून, या पत्रामधून मुकेश आंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहेडियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय, हा केवळ ट्रेलरपुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून राहा

मुंबई - देशातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर (mukesh ambani house) काल स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमधून एक पत्रही जप्त करण्यात आले असून, या पत्रामधून मुकेश आंबानी  (Mukesh Ambain) आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. (''Dear Nita Bhabhi and Mukesh Bhaiya; It's just a trailer, next time. threaten to Ambani family in The letter )

अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या संशयास्पद स्कॉर्पिओमधील पत्रात म्हटले आहे की, डियर नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय. हा केवळ ट्रेलर आहे. पुढच्या वेळी तुमच्या कुटुंबाला उडवण्यासाठीचे पूर्ण सामान येईल. सांभाळून राहा. दरम्यान, अंबानींच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली आणि त्यातील धमकीचे पत्र कुणी लिहिले होते. याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. मुकेश अंबानी यांच्या अल्टामाऊंट रोडवरील अँटिलिया निवासस्थानाजवळ काल संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या स्कॉर्पिओमध्ये २० जिलेटीनच्या कांड्या मिळाल्या. अंबानी यांच्या बंगल्यापासून जवळच हे वाहन उभे होते.  स्फोट होण्यासाठी जिलेटीनच्या कांड्या एकत्रित जोडलेल्या नव्हत्या. अधिक तपास सुरू आहे, असे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. दरम्यान, आता समोर येत असलेल्या माहितीनुसार या स्कॉर्पिओमध्ये मुंबई इंडियन्सचा लोगो असलेली एक बॅग, तसेच काही नंबर प्लेट्स आढळून आल्या आहेत. तसेच एक धमकीचे पत्रही या स्कॉर्पिओमधून हस्तगत करण्यात आले आहे.पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये ही स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यावरील नंबर प्लेट खोटी असल्याचे तपासात उघड झाहे आहे. ही स्कॉर्पिओ आठ ते दहा दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी झाली होती.  रात्री गाडी उभी केली!बुधवारी रात्री उशिरा तिथे गाडी उभी करण्यात आली होती. या गाडीत काही स्फोटके होती आणि गाडीत वेगवेगळ्या नंबरप्लेटही पोलिसांना सापडल्या. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीप्रमाणे, तिथे दोन गाड्या आल्या होत्या. दुसऱ्या गाडीबाबत अद्याप माहिती समजलेली नाही.सीसीटीव्ही ताब्यात मध्यरात्री एक वाजता कारमायकेल  रोड परिसरात ही गाडी पार्क करण्यात आली. गाडीतून उतरलेली व्यक्ती पाठीमागून आलेल्या दुसऱ्या गाडीत बसली. फ्लॅश लाईट ऑन केल्यामुळे गाड़ीचा क्रमांक सीसीटीव्हीत स्पष्ट दिसला नाही. परिसरातील अन्य सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकड़ून ताब्यात घेण्यात येत आहे. जिलेटीनच्या कांड्या किती घातक?खाणकाम, विहिरी खणणं, मोठमोठे दगड फोडणे किंवा दगड खाणींमध्ये जिलेटीनचा वापर होतो. लांबून वात पेटवून स्फोट घडवून, दगड फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. एका जिलेटीनच्या कांडीत भीषण स्फोटाची क्षमता असते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ तर २० ते २५ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या कांड्यांची तीव्रता किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीbusinessव्यवसायMumbaiमुंबईRelianceरिलायन्स