बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:51 PM2022-01-20T13:51:25+5:302022-01-20T14:35:54+5:30

Gangrape Case : पाच हजार रुपये घेऊन प्रकरण सोडवण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

Deal on gangrape, take five thousand rupees! Otherwise ... | बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा...

बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा...

Next

मधुबनी : खुटौना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलगी नववीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. आरोपी गावातीलच दबंग कुटुंबातील आहे. पाच हजार रुपये घेऊन प्रकरण सोडवण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

या घटनेबाबत सांगण्यात आले की, पीडित मुलगी आपल्याच गावात भागवत कथा ऐकून सायंकाळी उशिरा घरी परतत होती. वाटेत अगोदरच पाळत ठेऊन असलेल्या नराधमांनी पीडितेचा तोंड दाबून झुडपात नेला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीने आरडाओरड केल्यावर गावातील काही लोकांनी आरोपीला पकडले. त्याच्या तावडीतून मुलीची सुटका झाली.

बंदुकीची भीती दाखवून  नेले
पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश यादव आणि सत्यम यादव अशी आरोपींची नावे आहेत. याठिकाणी कुटुंबीय काही करत नाही तोपर्यंत काही लोकांनी आरोपींना संरक्षण देण्यासाठी गोळ्या आणि बंदुकीचा धाक दाखवून आरोपींना घेऊन गेले. आता हे कुटुंब न्यायासाठी घरोघरी भटकत आहे. आरोपीचे कुटुंबीय सतत मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहेत.

५ हजार रुपये घेऊन प्रकरण मिटवा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे जातीची संख्या कमी आहे, त्यामुळे आम्हाला कोणताही नेता किंवा आमदार पाठिंबा देत नाही. न्याय मिळाला नाही तर फास लावून मरणार आहोत. येथे पोलिसांनी तात्काळ अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र, पीडितेचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आधीच आर्थिक संकटातून जात असलेले कुटुंब या घटनेनंतर पूर्णतः कोसळले आहे.

Web Title: Deal on gangrape, take five thousand rupees! Otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app