हातपाय बांधून टाकलेला तरुणाचा नदीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 17:40 IST2019-10-10T17:37:43+5:302019-10-10T17:40:58+5:30

कमरेला दोरी, फेट्याच्या साह्याने दगड बांधलेले आणि दोन्ही हात पाय बांधलेल्या मृतदेह अवस्थेत आढळून आला.

The deadbody of a youth with was found in the river | हातपाय बांधून टाकलेला तरुणाचा नदीत आढळला मृतदेह

हातपाय बांधून टाकलेला तरुणाचा नदीत आढळला मृतदेह

लोणीकंद : पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवारी संध्याकाळी एक अनोळखी मृतदेह बुकेर्गाव परिसरातील नदीकाठी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी लोणीकंद पोलिस स्टेशनला गटनेची माहिती कळविली  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला व त्यावेळी कमरेला दोरी, फेट्याच्या साह्याने दगड बांधलेले आणि दोन्ही हात पाय बांधलेल्या मृतदेह अवस्थेत आढळून आला.
 लोणीकंद पोलिसांनी शिक्रापूर येथे मिसिंग असलेल्या हनुमंत ऐवळे कुटुंबाला याबाबत कळविल्यानंतर ऐवळे कुटुंबीयांनी ससूनमध्ये जाऊन त्याची पाहणी केली असता. हा मृतदेह हनुमंत ऐवळेचा असल्याचे सांगितले.लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल कण्यात येत आहे. सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास आपल्या पत्नीस दहा मिनिटात आलो, असे सांगून सांगून हनुमंत ऐवळे हा तरुण बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती. परंतु, शेवटपर्यंत शिक्रापूर पोलिसांनी तपास केला नसल्याचा आरोप मयत व्यक्तीच्या घरच्यांनी केला आहे. हनुमंत ऐवळेचा तपास न केल्याचा आरोप ऐवळे कुटुंबीय व्यक्त करत आहे. एकूणच काय तर या घटनेमुळे शिक्रापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे. 

Web Title: The deadbody of a youth with was found in the river