मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 19:16 IST2018-07-19T19:16:12+5:302018-07-19T19:16:43+5:30

आज दुपारी ४. १५ वाजताच्या सुमारास सापडला मृतदेह

The dead body of an unknown woman found in the sea of ​​Marine Drive | मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 

मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 

मुंबई - मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी. डी.चौकासमोर असलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावर खडकात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आज दुपारी ४. १५ वाजताच्या सुमारास सापडला आहे. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कुजलेल्या अवस्थेत पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेला अंदाजे ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जी. टी. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. कोणत्या तक्रारदारांची हरवलेल्या महिलेची तक्रार असल्यास त्याने पुढे येऊन मृतदेह ओळखावा असे त्यांनी आवाहन केले आहे. 

Web Title: The dead body of an unknown woman found in the sea of ​​Marine Drive