खळबळजनक! कारमध्ये संशयास्पदरित्या सापडला पोलिसाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 09:10 PM2020-06-06T21:10:10+5:302020-06-06T21:16:49+5:30

त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

The dead body of a policeman was found suspiciously in the car | खळबळजनक! कारमध्ये संशयास्पदरित्या सापडला पोलिसाचा मृतदेह

खळबळजनक! कारमध्ये संशयास्पदरित्या सापडला पोलिसाचा मृतदेह

Next
ठळक मुद्देरामपुरा येथील एका दुकानासमोर सकाळी 11 वाजता कार उभी होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. कारमध्ये शोध घेतलेल्या कागदपत्रांवरून विशालची ओळख पटली.

नवी दिल्ली - दिल्लीपोलिसांच्या जवानाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत केशवपुरम परिसरात सापडला आहे. ४५ वर्षांचा विशाल कुमार हा १९९८ बॅचचा पोलिस अधिकारी होता. दिल्ली दंगली प्रकरणात तो तपास पथकाचा भाग होता असेही म्हटले जात आहे. त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

रामपुरा येथील एका दुकानासमोर सकाळी 11 वाजता कार उभी होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. एका व्यक्तीने गाडीच्या आत एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीला दिली असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. नंतर पोलिसांनी त्याला तातडीने भाजपाआरएम रुग्णालयात दाखल केले. तोवर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कारमध्ये शोध घेतलेल्या कागदपत्रांवरून विशालची ओळख पटली. विशाल आपल्या कुटुंबासोबत शालीमार बाग येथे राहतो. पोलिसांनी सांगितले की, सर्व कनेक्शन लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.

दिल्ली दंगली प्रकरणात आज पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे
दिल्ली दंगलीत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिस आता स्वतंत्र प्रकरणात आरोपपत्र दाखल करत आहेत. एका 27 वर्षीय लॉ शिकणाऱ्या  विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी सात जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. 24 फेब्रुवारीला राहुल सोलंकी नावाच्या विद्यार्थ्याला शिवविहारजवळ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पोलिसांनी सांगितले, "चौकशीत असे समोर आले आहे की, जवळच्या दुकानात सामान उचलायला जात असताना त्याची वाटेतच हत्या करण्यात आली."

 

Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस

 

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

Web Title: The dead body of a policeman was found suspiciously in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.