गूढ रहस्य सुटेना! २२ दिवसांनी लग्न होणाऱ्या युवतीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 12:11 IST2023-10-23T12:10:50+5:302023-10-23T12:11:49+5:30

शहजादीचं पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील एका युवकासोबत लग्न होणार होते

Dead body of girl Shahzadi found in hotel room at UP Gaziabaad | गूढ रहस्य सुटेना! २२ दिवसांनी लग्न होणाऱ्या युवतीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

गूढ रहस्य सुटेना! २२ दिवसांनी लग्न होणाऱ्या युवतीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

गाझियाबाद – डासना परिसरातील एका हॉटेलमध्ये रविवारी युवतीचा मृतदेह सापडला. लग्नापूर्वी शॉपिंग करण्यासाठी ही युवती २ दिवसांपूर्वी हापूडला आली होती. ती तिच्या मित्रासोबत हॉटेलला थांबली होती. पोलीस तपासात मुलीच्या तोंडातून फेस येत असल्याचे समोर आले. मृत युवती २३ वर्षाची असून तिचं नाव शहजादी असल्याची ओळख पटली.

शहजादीचं पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिल्लीतील एका युवकासोबत लग्न होणार होते. मागील शुक्रवारी युवती तिचा मित्र अजरुद्दीनसोबत लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली. डासनाच्या अनंत हॉटेलमध्ये तिने मित्रासोबत रुम शेअर केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ त्यांना देण्यात आला. त्याच रुममध्ये दुसऱ्या दिवशी युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला. युवतीसोबत हॉटेलला थांबलेल्या मित्राने शहजादीचा भाऊ दानिशला या घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी हॉटेलमधील युवतीचा मृतदेह ताब्यात घेतला. तर मृत युवतीचा भाऊ दानिशने शहजादीचा मृत्यू नव्हे हत्या आहे आणि त्याने अजरुद्दीनवर हत्येचा आरोप केला. तर या घटनेनंतर शनिवारी रात्री अजरुद्दीने हॉटेलच्या स्टाफला रुमची चावी देऊन तिथून पसार झाला. सध्या पोलीस अजरुद्दीनचा शोध घेत आहे. शहजादीचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलीस सर्व अँगलने तपास करतंय. त्यात सुसाइड आणि हत्यासह अनेक शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

इतक्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर याआधीही डासना परिसरातील याच अनंत हॉटेलमध्ये एका युवतीचा मृत्यू झाला होता. आता ही दुसरी घटना आहे ज्यात युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे युवतींच्या हत्येमागचे गूढ काय हे शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान आहे. पोलिसांनी या युवतीच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली असून तिचा मृत्यू कसा आणि का झाला याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं नेमली आहे. लवकरच यातील स्पष्टता लोकांसमोर येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Web Title: Dead body of girl Shahzadi found in hotel room at UP Gaziabaad