VIDEO : दिवसाढवळ्या घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड, १४ गुन्हे उघडकीस
By प्रशांत माने | Updated: August 30, 2022 23:07 IST2022-08-30T23:03:41+5:302022-08-30T23:07:11+5:30
डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्टला घडलेल्या एका घरफोडी घटनेचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करीत होते. घटना घडली त्या परीसरात असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला होता.

VIDEO : दिवसाढवळ्या घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड, १४ गुन्हे उघडकीस
डोंबिवली: दिवसाढवळया घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मुंब्रा येथून मंगळवारी अटक केली. अब्रार अकबर शेख (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या चौकशीत १४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून ५५ हजाराची रोकड, दोन मोबाईल असा ७० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्टला घडलेल्या एका घरफोडी घटनेचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करीत होते. घटना घडली त्या परीसरात असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला होता. दरम्यान पोलीस शिपाई विनोद चन्ने यांना गुप्त बातमीदारामार्फत त्या घटनेतील संशयित आरोपी मुंब्रा कौसा भागात फिरत असल्याची माहीती मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा लावून अब्ररारला बेड्या ठोकल्या.
दिवसाढवळ्या घरफोडी करणाराअट्टल चोरटा गजाआड, १४ गुन्हे उघडकीस#CrimeNewspic.twitter.com/mnNDUQENdA
— Lokmat (@lokmat) August 30, 2022
त्याच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात ५, आगरीपाडा पोलीस ठाण्यात ३, कळवा पोलीस ठाणे ४, नयानगर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ असे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहीती पोलिसांनी दिली. त्याची रवानगी रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.