भरदिवसाचा थरार; पुसदमध्ये गोळीबारात एक ठार, मारेकरी अज्ञात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 03:32 PM2021-07-25T15:32:18+5:302021-07-25T15:32:47+5:30

Firing Case :  वाशिम रोडवरील घटना 

In daylight firing One killed in Pusad shooting, killer unknown | भरदिवसाचा थरार; पुसदमध्ये गोळीबारात एक ठार, मारेकरी अज्ञात

भरदिवसाचा थरार; पुसदमध्ये गोळीबारात एक ठार, मारेकरी अज्ञात

Next
ठळक मुद्देइम्तीयाज खान सरदार खान (२८) रा. वसंतनगर पुसद असे मृताचे नाव आहे.

पुसद (यवतमाळ) : शहरातून वाशिमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका हाॅटेलजवळ भरदिवसा युवकावर गोळीबार झाला. यात युवक ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.


इम्तीयाज खान सरदार खान (२८) रा. वसंतनगर पुसद असे मृताचे नाव आहे. वाशिम रोडवरील एका हाॅटेलजवळ त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी गोळीबार केला. मृतावर सहा राऊंड फायर करण्यात आले. यात दोन गोळ्या मृताच्या शरीराला लागल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जुन्या वैमनस्यातून घडल्याचे सांगितले जाते. 


घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, शहर ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलीस अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधात आहे. एक पथक मारेकऱ्यांच्या मागावर पाठविण्यात आले आहे.

Web Title: In daylight firing One killed in Pusad shooting, killer unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app