लग्नात परपुरुषाशी डान्स करणं महिलेच्या जीवावर बेतलं, पतीने केली पत्नीला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:35 PM2022-05-30T17:35:47+5:302022-05-30T17:37:55+5:30

Murder Case : नाचण्यात दंग असलेल्या शांती देवीने घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर पती शीतल भारती रागाच्या भरात घरी निघून गेली.

Dancing with a stranger at a wedding kills woman's life, husband beats wife to death | लग्नात परपुरुषाशी डान्स करणं महिलेच्या जीवावर बेतलं, पतीने केली पत्नीला बेदम मारहाण

लग्नात परपुरुषाशी डान्स करणं महिलेच्या जीवावर बेतलं, पतीने केली पत्नीला बेदम मारहाण

googlenewsNext

झारखंड : लग्नसोहळ्यात परपुरुषासोबत नाचणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. झारखंडमधील चतरा येथे ही धक्क्कादायक घटना घडली आहे. लारकुवा गावात शनिवारी एक लग्नसोहळा सुरू होता. यावेळी गावातील महिला आणि पुरुष डीजेवर नाचत होते. यामध्ये काही पुरुष जोड्याने त्यांच्या पत्नीसोबत डान्स करत होते. याच लग्नात शांती देवी नावाची महिलाही तिचा पती शीतल भारतीसोबत नाचत होती. दरम्यान शांती देवीचा पती मद्यपान केलेल्या अवस्थेत होता. काही वेळ नाचल्यानंतर शांती देवीचा नवरा थांबला. नंतर त्याने शांती देवीला घरी जाण्याबाबत सांगितले. मात्र, नाचण्यात दंग असलेल्या शांती देवीने घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर पती शीतल भारती रागाच्या भरात घरी निघून गेली.

जवळपास दोन तासांनी जेव्हा शांती देवी घरी पोहोचली, तेव्हा पती शीतल भारती दरवाजा उघडण्यासाठी आला. त्याने पत्नीला उशीरा घरी येण्याचं कारण विचारलं, तेव्हा महिलेनं नाचत होती असं सांगितले. यानंतर नवऱ्याला राग अनावर झाला आणि त्याने घरातील लाठ्या बाहेर काढल्या आणि पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पती शीतल भारती रागाने रागाच्या भरात पत्नी शांती देवीला जवळपास १५ मिनिटे बेदम मारहाण केली. या मारहाणीत काही वेळातच पत्नीचा मृत्यू झाला.

आत्महत्या दाखवण्यासाठी मृतदेह लटकवला

पत्नीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा छडा लागू नये म्हणून पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने आणखी एक युक्ती आजमावली. कुटुंबीयांनी महिलेचा मृतदेह लटकवला.

पोलिसांनीअटक केली

नातेवाइकांनी स्वत: पोलिसांना फोन केला, त्यानंतर पोलीस पोहोचले, त्यांनी मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात आणला, मात्र शरीरावरील जखमांच्या खुणा पाहून महिलेचा खून झाल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली तर इतर फरार आहेत.

Web Title: Dancing with a stranger at a wedding kills woman's life, husband beats wife to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.