नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:38 IST2025-10-08T15:37:26+5:302025-10-08T15:38:14+5:30
सासू आणि जावयाच्या नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे.

फोटो - AI फोटो
उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये सासू आणि जावयाच्या नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. सासूच्या प्रेमात वेडा झालेल्या एका तरुणाने त्याची पत्नी शिवानीची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पती प्रमोद आपल्या कुटुंबासह पळून गेला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
सिद्धपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील नगला परसी गावात ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना एका विवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना शिवानीचा मृतदेह आढळला, जो ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शिवानीचं २०१८ मध्ये प्रमोदशी लग्न झालं होतं.
शिवानीच्या कुटुंबाने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, प्रमोदचे त्याच्या सासूशी प्रेमसंबंध होते, ज्यामुळे या जोडप्यात दररोज भांडणं होत असत. या प्रेमसंबंधामुळे प्रमोद शिवानीला सतत मारहाणही करायचा. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणामुळेच रागाच्या भरात प्रमोदने शिवानीची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी पती प्रमोद त्याच्या कुटुंबासह घरातून पळून गेला. सर्वात धक्कादायक म्हणजे, सासू आणि जावयाचे काही आक्षेपार्ह फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि सर्व आरोपींना शोधण्यासाठी छापे टाकत आहेत.