शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Dahi handi 2018 : अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 21:29 IST

सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज माल, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. 

पुणे -  दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा आणल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज माल, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंट माल विजय नरुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत़. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे़ अरण्येश्वर चौकात दहीहंडी उत्सव मंडळाने विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी स्टेजची रोडवर बांधणी करुन त्यावर कार्यक्रम आयोजित केला होता़ मोठ्या  क्षमतेची साऊंड सिस्टिम लावून जाणून बुजून ध्वनी प्रदुषण केले़ तसेच रहदारीला अडथळा निर्माण केला़ तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना कार्यक्रम बंद सांगितले़ त्यांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़. बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळ येथे दहीहंडीचा उत्सव साजरा करताना स्टेज कोसळल्याने पाच जण जखमी झाले होते़ सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडलेल्या या घटनेत पोलिसांनी मंडळावर गुन्हा दाखल केला आहे़  दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला पारितोषीक घेण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आले होते. स्टेजवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज मधोमध दबले जाऊन कोसळले. यामध्ये पाच नागरिक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष साईनाथ माने, उपाध्यक्ष शंकर भोसले, कार्याध्यक्ष नवनाथ परदेशी आणी स्टेज ठेकदार दत्तात्रय हेलकरी याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDahi Handiदही हंडीMaharashtraमहाराष्ट्र