शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पप्पा माझ्या मृत्यूचा बदला जरूर घ्या! सुसाईड नोटमध्ये लिहून तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 22:18 IST

Suicide Case :पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला जरूर घ्या’, असं लिहिलं आहे. या सुसाईट नोटमुळे एकाच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला काही तरुण त्रास देत होते. त्यामुळे ही मुलगी खूप त्रासलेली होती.

उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला वैतागून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने साडीच्या सहाय्याने राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवलेली असून त्यात ‘माझ्या मृत्यूला रुस्तम जबाबदार आहे. त्याने माझ्याशी दुष्कर्म केले आहे. पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला जरूर घ्या’, असं लिहिलं आहे. या सुसाईट नोटमुळे एकाच खळबळ उडाली आहे.

आत्महत्येच्या घटनेनंतर या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांविरोधात भादंवि कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी असलेला रुस्तम अद्याप मोकाट आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस शोधमोहीम राबवत आहेत.  

जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला काही तरुण त्रास देत होते. त्यामुळे ही मुलगी खूप त्रासलेली होती. मंगळवारी, ही मुलगी रात्री झोपण्यासाठी तिच्या खोलीत गेली. मात्र सकाळी खूप उशिरापर्यंत खोलीतून बाहेर न आल्याने आईने खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा तिला धक्काच बसला. मुलीने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. हे सर्व पाहून मुलीच्या आईने हंबरडा फोडत आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. यावेळी कुटुंबीयांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलीने तिच्या मृत्यूसाठी रुस्तमला जबाबदार धरले होते. रुस्तमने आपल्यासोबत वाईट कृत्य केल्याचा आरोप मृत मुलीने या सुसाईड नोटमधून केला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू