शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 15:28 IST

एक लाखाची रोकड लुटून नेली

ठळक मुद्देदोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे. या घटनेचा तपास सुरू असून अधिक माहिती रात्रीपर्यंत स्पष्ट होईल, असे पोलिस सांगत आहेत.

नागपूर : हिंगणा एमआयडीसी परिसरातील आऊटर रिंग रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी पहाटे दरोडा घातला. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे. उगले यांच्या मालकीच्या विद्या सर्वो पेट्रोल पंपावर ही घटना गुरुवारी पहाटे घडल्याचे पोलिस सांगतात. दरोडेखोरांनी एक लाखाची रोकड लुटून नेल्याचे समजते. या घटनेचा तपास सुरू असून अधिक माहिती रात्रीपर्यंत स्पष्ट होईल, असे पोलिस सांगत आहेत.

पंढरी भांडारकर (वय ६१, जयताळा) आणि लीलाधर गवते ( वय ५३) अशी दरोडेखोरांच्या क्रूरतेला बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यातील भांडारकर जागीच ठार झाले तर गवतेंची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी  भांडारकर आणि गवते या दोघांची नाईट शिफ्ट होती. ग्राहक नसल्याने ते मध्यरात्री झोपले. पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने चार ते पाच सशस्त्र दरोडेखोर आले. त्यांनी झोपेतच दोन्ही कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड तलवार आणि चाकूने हल्ला केला. भांडारकर यांच्या छातीत कुऱ्हाडीने घाव घातल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गवते गंभीर जखमी झाले. गुरुवारी भल्या सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच  एमआयडीसी आणि हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनीही भेट दिली. एमआयडीसी पोलिसांनी नंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून  ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला. फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक एक्सपोर्टसनाही बोलावून घेण्यात आले. सीसीटीव्ही नादुरुस्त पोलिसांनी ही घटना नेमकी कधी घडली, किती दरोडेखोर होते, त्यांनी कोणती शस्त्रे वापरली, कोणत्या मार्गाने पळून गेले, याचा शोध घेण्यासाठी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. मात्र येथील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाजूच्या एका सीसीटीव्ही तून फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्या फुटेज वरून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, मिळालेल्या धाग्यादोऱ्यावरून पोलिसांनी पाच संशयितांना दुपारी ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरू होती.कुऱ्हाडीने फोडले लॉकरसूत्रांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी भांडारकर आणि गवते यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातल्यानंतर त्याच कुऱ्हाडीने लॉकर फोडले. त्यामुळे लॉकरवर रक्ताचे डाग पडले आहे. नेमकी रक्कम किती ते दुपारपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, रोकड किमान एक लाख रुपये असावी, असा अंदाज पेट्रोल पंप संचालकांनी  व्यक्त केल्याचे ठाणेदार खराबे यांनी लोकमत'ला सांगितले.

 

शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड

 

तक्रारदार तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकाला अटक

 

खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

 

Coronavirus : मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का, दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू  

 

शेजारणीवर जीव जडला; पत्नीसह जन्मदात्यांचा 8 लाखांची सुपारी देऊन काढला काटा

टॅग्स :DacoityदरोडाnagpurनागपूरPoliceपोलिसPetrol Pumpपेट्रोल पंप