ठळक मुद्दे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून सहा दरोडेखोर हत्यारांसह आले. दरोडेखोरांचे फोटो जारी करून नागरिकांना ते दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या आयटीआय गोल्ड लोनच्या कार्यालयावर आज भरदिवसा सशस्त्र दारोडा अज्ञात गुंडांनी घातला आहे. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून सहा दरोडेखोर हत्यारांसह आले. या दरोडेखोऱ्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून १ कोटी ७५ लाख किंमतीचं सोनं लुटले आहे.

सोनं पळवून नेत असताना या दरोडेखोरांनी चारचाकी गाडीमध्येच सोडली आणि दुचाकीवरून फरार झाले. या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांनी दरोडेखोऱ्यांचे फोटो जाहीर केले आहे. पोलीस त्याद्वारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यापासून तीनशे मीटर अंतरावर सेन्ट्रल पार्क या मुख्य रस्त्यावर युनायटेड पेट्रो फायनान्स कंपनीचे गोल्ड लोनचे ऑफिस  आहे. येथे सोनं तारण ठेवून त्यावर कर्ज दिलं जातं. तसेच येथे लॉकर सुविधा देखील दिली आहे.


आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ६ सशस्त्र दरोडेखोर लाल रंगाच्या तवेरा गाडीने आले. दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता आणि मंकी कॅपसुद्धा  घातली होती. या दरोडेखोरांनी कार्यालयात घुसून पहिल्यांदा कार्यालयातील कर्माच्याऱ्यावर तलवार, चाकू आणि पिस्तूल रोखले. कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून ठेवले आणि त्यानंतर कार्यालयातील २३४ लॉकर्समधील सोनं दोन थैल्यांमधून भरुन नेलं. १ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किंमतीचं ४.६५९ किलो वजनाचं सोनं लुटून दरोडेखोर फरार झाले. ज्या गाडीतून दरोडेखोर आले होते,  ती तवेरा गाडी विरार पूर्वेकडील मोहक सिटी परिसरात सोडून तेथून बाईकने हे दरोडेखोर पळाले. पोलिसांनी गाडी आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. तसेच दरोडेखोरांचे फोटो जारी करून नागरिकांना ते दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 


Web Title: Dacoity at Gold Bank in a day time; 1.75 crore gold looted by robbers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.