शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 7:27 PM

उर्वरित पाच जणांचा शोध सुरुच; पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची माहिती

ठळक मुद्देभिवंडीत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील एक दरोडेखोर जेरबंद; एक कोटी २६ लाखांचे चार किलोचे सोने हस्तगतआणखी पाच जणांच्या शोधासाठी दोन वेगवेगळी पथके नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे - भिवंडीतील काल्हेर गावातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे दरोडा टाकून एक कोटीे ८६ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील धर्मेश रणछोड वैष्णव (38, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला सर्व सोन्याच्या दागिन्यांसह अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यातील आणखी पाच जणांच्या शोधासाठी दोन वेगवेगळी पथके नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.भिवंडीतील काल्हेर गावातील बांधकाम तसेच वेअर हाऊसचे व्यावसायिक जगदीश पाटील हे ३० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते बंगल्याबाहेर पडताच धर्मेश याच्यासह सहा जणांच्या टोळीपैकी चौघांनी अग्निशस्त्रांसह त्यांच्या बंगल्यात शिरकाव केला. त्यावेळी पाटील यांची पत्नी आणि मुलगी गाढ झोपेत होते. त्याचवेळी या टोळीने त्यांच्या बेडरुममध्ये शिरकाव करुन त्यांच्या पत्नीच्या डोक्याला बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत घरातील दोन महिला आणि एक पुरुष असा तिघांचे हातपाय रस्सीने हातपाय बांधले. त्यावेळी त्यांच्या मुलीने घरातील ४२१ तोळे सोने आणि सुमारे ६० लाखांची रोकड असा सुमारे एक कोटी ८६ लाख ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरीने लुटून पलायन केले होते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दरोडयासह आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता.

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव अशा दोघांच्या नेतृत्वाखाली आठ वेगवेगळया पथकांकडून या दरोडयाचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे यामध्ये धर्मेश वैष्णव या दरोडेखोराचे नाव समोर आले. सलग तीन दिवस आणि तीन रात्र मेहनत घेऊन मोठया कौशल्याने धर्मेशला एक बॅगेसह होनराव यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व म्हणजे चार किलो २१ ग्रॅम वजनाचे एक कोटी २६ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. त्याला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या आणखी पाच साथीदारांपैकी तिघे पंजाबमध्ये तर दोघे चेन्नईमध्ये पसार झाले असून त्यांचाही शोध घेण्यासाठी दोन वेगवेगळी पथके दोन्ही ठिकाणी रवाना झाली आहेत. पलायन केलेल्या आरोपींनी दरोडयातील रोकड नेल्याचेही धर्मेशने चौकशीत पोलिसांना सांगितले. दरोडयाच्या वेळी चौघांनी घरात शिरकाव केला होता. तर अन्य दोघे घराबाहेर पाळतीवर होते.

मध्यप्रदेशातील राजगडमध्येही दरोडाधर्मेश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने याआधी मध्येप्रदेशातील राजगड येथेही २०१५ मध्ये दरोडा टाकला होता. या दरोडयामध्येही त्याने सराफाच्या दुकानातील सोन्याचे दागिने लुटले होते. याच गुन्हयामध्ये त्याला दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो जामीनावर सुटल्यानंतर त्याने भिवंडीतील काल्हेरमध्ये काही साथीदारांच्या मदतीने पुन्हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.तपास पथकांना ५० हजारांचे बक्षिसपोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि अनिल होनराव या दोघांच्या पथकांनी अत्यंत मेहनतीने अवघड असलेल्या या दरोडयाचा मोठया कौशल्याने तपास केल्याचे सांगत दोन्ही पथकांसाठी प्रत्येकी २५ हजारांचे असे ५० हजारांचे बक्षिस पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :DacoityदरोडाArrestअटकPoliceपोलिसBhiwandiभिवंडीthaneठाणे