बिबवेवाडी येथील सोफा निर्मितीच्या कारखान्याला सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 17:32 IST2019-03-30T16:56:42+5:302019-03-30T17:32:03+5:30

बिबवेवाडी येथील गांगाधा म रोडवरील आईमाता मंदिरा शेजारील सोफा बनवणाऱ्या कारखान्याला साधारण दुपारी तीन वाजता भीषण आग लागली.

Cylinder blast in Sofa a manufacturing factory at Bibwewadi | बिबवेवाडी येथील सोफा निर्मितीच्या कारखान्याला सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग 

बिबवेवाडी येथील सोफा निर्मितीच्या कारखान्याला सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग 

पुणे: बिबवेवाडी येथील गांगाधा म रोडवरील आईमाता मंदिरा शेजारील सोफा बनवणाऱ्या कारखान्याला साधारण दुपारी तीन वाजता भीषण आग लागली. कार खान्यातील सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील गंगा धाम रोडवरील आई माता मंदिराला लागूनच असलेल्या भंगारचे गोदाम व सोफा बनवण्याच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगी मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून मालमत्तेचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ही आग एवढी भीषण होती की , शेजारीच असलेल्या मांडवाच्या गोदामाला ही आग लागली होती. या आगीत अंदाजे ४ दुचाकी जळून खाक झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . त्यांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले 

Web Title: Cylinder blast in Sofa a manufacturing factory at Bibwewadi