Video : मोझिला हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट; चारजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 14:39 IST2019-01-09T14:35:20+5:302019-01-09T14:39:37+5:30
मोझिला या हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटामुळे 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल आणि नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

Video : मोझिला हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट; चारजण जखमी
उरण - रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील मिलिंद सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या मोझिला या हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडरचा स्फोटामुळे 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल आणि नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आलं आणि त्यांनी आग विझवली आहे.
उरण शहरातील बिमला तलावनजीक असलेल्या मोझिला कॅफे हॉटेलमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात हॉटेलचे शटर उघडण्यासाठी गेलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याचं नावं मनील हिरा (३५) असून तो ७० टक्के भाजला आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षेतील प्रवासी आणि मोटारसायकलस्वार जखमी झाला आहेत. दमर गुल (२४), संगीता ठाकूर (४२) आणि संजय ठाकूर (५४) अशी यांची नावे आहेत.