प्रेयसीचे केस कापून विद्रूप करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 01:14 IST2019-05-09T01:13:25+5:302019-05-09T01:14:21+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याचा प्रकार वांगणीत घडला आहे. प्रियकराच्या अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याने, संतापलेल्या प्रियकराने तरूणीला मारहाण केली.

Cut the hair of a lover and trick it off | प्रेयसीचे केस कापून विद्रूप करण्याचा प्रयत्न

प्रेयसीचे केस कापून विद्रूप करण्याचा प्रयत्न

बदलापूर  - लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याचा प्रकार वांगणीत घडला आहे. प्रियकराच्या अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याने, संतापलेल्या प्रियकराने तरूणीला मारहाण केली. एवढेच नव्हे तर, केस कापून तिला विद्रूप करण्याचा प्रकारही आरोपी प्रियकराने केला. याप्रकरणी कुळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांगणीतील अमित शेलार आणि पीडित तरूणीचे प्रेमसंबंध होते. ते दोघेही एकत्र राहत होते. मुंबईतील एका बारमध्ये त्यांची ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोपही तरूणीने केला आहे. त्याचवेळी अमितचे अन्य तरूणीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पीडित तरूणीने त्याला जाब विचारला; मात्र त्यामुळे संतप्त झालेल्या अमितने तरूणीला मारहाण केली. डोक्यावरचे केस कापत तिला विद्रूप करण्याचा प्रयत्नही त्याने केला.

Web Title: Cut the hair of a lover and trick it off