लस्सी पिण्यासाठी म्हणून आले; दुकानदार महिलेला व्यस्त पाहून पर्ससह मोबाईल केला लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 10:52 IST2021-03-10T10:51:17+5:302021-03-10T10:52:15+5:30

Crime News: चिखली येथील नेवाळे वस्ती येथे आर. एस. डेअरी या आइस्क्रीम पार्लर येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

Customers who came to drink lassi; theft mobile and purse | लस्सी पिण्यासाठी म्हणून आले; दुकानदार महिलेला व्यस्त पाहून पर्ससह मोबाईल केला लंपास

लस्सी पिण्यासाठी म्हणून आले; दुकानदार महिलेला व्यस्त पाहून पर्ससह मोबाईल केला लंपास

पिंपरी : लस्सी पिण्यासाठी व आइस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी लेडीज पर्स मोबाइल व रोख रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी एकूण सात हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चिखली येथील नेवाळे वस्ती येथे आर. एस. डेअरी या आइस्क्रीम पार्लर येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

स्नेहा दुर्गेश बैस (वय ३२, चिखली) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आर. एस. डेअरी या आइस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांना लस्सी देऊन आईस्क्रीम मोजून देत होत्या. त्यावेळी तेथे लस्सी पीत असलेल्या व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी ग्राहकांपैकी कोणीतरी फिर्यादी यांची लेडीज पर्स, मोबाईल व रोख रक्कम, असा एकूण सात हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Web Title: Customers who came to drink lassi; theft mobile and purse