पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून एका तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना किवळे परिसरात घडली. या अत्याचारात आरोपीने युवतीच्या शरीरावर अगरबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. युवतीचे फोटो काढून ते तिच्या घरच्यांना पाठवण्याची धमकी आरोपीने दिली होती. याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किवळे परिसरातील एका सोसायटीत हा प्रकार घडला. तरुणीला आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. तसेच तिचे टॉपलेस फोटो घरच्यांना पाठविण्याची धमकी दिली. यावेळी आरोपीने तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिच्या हातावर, पायावर अगरबत्तीचे चटके दिले. इतकेच नव्हे तर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करुन शिवीगाळ व मारहाण केली. असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. वाकड पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
विकृतीचा कळस! लग्नाच्या अमिषाने तरुणीवर अत्याचार,अंगाला दिले अगरबत्तीचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 16:10 IST
युवतीचे फोटो काढून ते तिच्या घरच्यांना पाठवण्याची दिली धमकी
विकृतीचा कळस! लग्नाच्या अमिषाने तरुणीवर अत्याचार,अंगाला दिले अगरबत्तीचे चटके
ठळक मुद्देशारीरिक संबंध प्रस्थापित करुन शिवीगाळ व मारहाण