विकृतीचा कळस! मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:54 PM2020-05-20T16:54:05+5:302020-05-20T16:55:06+5:30

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना खाण्यापिण्याची कमतरता भासू लागली आहे.

The culmination of perversion! Attempt to rape a woman by showing pornographic videos under the pretext of giving her free rice pda | विकृतीचा कळस! मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून बलात्काराचा प्रयत्न

विकृतीचा कळस! मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून बलात्काराचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देसंगमरवरी कंत्राटदाराने शेजारी राहणाऱ्या  महिलेला 2 किलो तांदूळ देण्यासाठी म्हणून बोलावले आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील आहे.त्याने घटनेची चर्चा कोणालाही केल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. यासह त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली.

एका नराधमाने लॉकडाऊनचा फायदा उचलत मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेले बोलावले आणि तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना खाण्यापिण्याची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत एका संगमरवरी कंत्राटदाराने शेजारी राहणाऱ्या  महिलेला 2 किलो तांदूळ देण्यासाठी म्हणून बोलावले आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनजेपी पोलिस स्टेशनच्या पूर्व फुलवारी येथील धनाटला भागातील महिलेला शेजारी राहणाऱ्या मुजबीर रहमान या नराधमाने 2 किलो तांदुळाचे आमिष दाखवून घरी बोलावले. महिला घरी आल्यानंतर मुजबीर रहमानने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला, परंतु ती महिला पळून गेली आणि आपल्या घरी पोहोचली. यानंतर तिने आपल्या पतीला संपूर्ण घटनेची माहिती दिली.

आरोपीने अश्लील व्हिडिओही सेव्ह करून ठेवला होता

पीडित महिलेचा नवरा मुजबीर रहमान येथे संगमरवरी मेकानिक म्हणून काम करतो. मुजबीर रहमान हा व्यवसायाने संगमरवरी ठेकेदार आहेत. काही काळापूर्वी मुजबीर रहमाननेही या महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनविला होता. पीडित महिलेने सांगितले की, सोमवारी जेव्हा ती मुजबीर रहमानच्या घरी 2 किलो तांदूळ घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर मुजबीर रहमानने तिला आपला आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ दाखवला आणि तिला जबरदस्तीने घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला त्याच्या महिलेवर बलात्कार करण्यास संधी मिळू शकले नाही, तेव्हा त्याने घटनेची चर्चा कोणालाही केल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. यासह त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली.

बलात्काराचा प्रयत्न केल्याची पोलिस ठाण्यात तक्रार
पीडित महिलेने मुजबीर रहमानवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सिलीगुडी महानगरातील एनजेपी पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर आरोपी मुजबीर रहमान परिसरातून फरार झाला. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. या घटनेत पीडितेने पोलिस प्रशासनाकडून न्यायाची मागणी केली आहे.

 

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

Web Title: The culmination of perversion! Attempt to rape a woman by showing pornographic videos under the pretext of giving her free rice pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.