शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

क्रूरपणाचा कळस! घटस्फोट घेण्यासाठी गरोदर पत्नीला टोचले HIVचं इंजेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 22:14 IST

HIV injection given to pregnant wife for divorce : पत्नीने या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देतीचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यासोबत लैंगिक संबंध असल्याची बाब पत्नीच्या कानावर आली. एक दिवस पतीनं HIVचं इंजेक्शनच पत्नीला दिलं. यामुळे तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळालादेखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली.

गरोदर पत्नी घटस्फोटा देण्यासाठी तयार होत नसल्यामुळे पतीने तिला HIVचं इंजेक्शन टोचल्याचा क्रूर प्रकार समोर आला आहे. विवाहबाह्य संबंध असणाऱ्या पतीने आपल्या पत्नीपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हे अमानूष कृत्य केले. पत्नीने या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशमधील अलिगड परिसरात राहणाऱ्या तरुणीची लगीनगाठ लग्न रामघाट रोड परिसरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याशी बांधली. ७ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या या लग्नात त्यानं पत्नीच्या कुटुंबीयांकडून १२ लाख रुपये रोख आणि २५ लाखांचे दागिने तसेच इतर वस्तूंच्या स्वरुपात हुंडा घेतला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच त्याचे आणि पत्नीचे संबंध बिघडू लागले आणि दोघांत कटुता निर्माण झाली. पतीचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यासोबत लैंगिक संबंध असल्याची बाब पत्नीच्या कानावर आली. याबाबत पतीला जाब विचारल्यानंतर त्यांच्यात खूपच खटके उडण्यास सुरुवात झाली. नंतर पतीने पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र, त्यावेळी पत्नीच्या आईवडिलांनी दोघांची समजूत काढून प्रकरण तात्पुरते थोपवले होते.पुन्हा काही दिवसांपासूर्वी पत्नी गर्भवती असल्याचं समजल्यावरही तिचा छळ करणं पतीने आणि सासरच्यांनी सुरुच ठेवला. तुमची मुलगी सतत आजारी पडत असल्यामुळे आपल्याला तिच्यापासून घटस्फोट पाहिजे असल्याचं पतीनं सांगितले. मात्र, ती गरोदर असल्यामुळे अधूनमधून आजारी पडत असेल, अशी समजूत पत्नीच्या आईवडिलांनी काढली. नंतर एक दिवस पतीनं HIVचं इंजेक्शनच पत्नीला दिलं. यामुळे तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळालादेखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रकाराने धक्का बसलेल्या पत्नीने वडिलांच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसdowryहुंडाDivorceघटस्फोट