२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 07:01 IST2025-10-18T07:00:43+5:302025-10-18T07:01:49+5:30
पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा.

२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
मुंबई/नवी दिल्ली : पाँझी स्किममार्फत भारतातील ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ऑक्टाएफएक्स या फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी ईडीने कारवाई करत २,३८५ कोटी रु.ची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. तर स्पेनमध्ये या घोटाळ्याचा सूत्रधार पावेल प्रोझोरोव्ह याला अटक केली आहे.
ऑक्टाएफएक्सचे कारनामे
जुलै २२ ते एप्रिल २३ या काळात भारतीय ग्राहकांचे १,८७५ कोटी रु. डुबवले; ८०० कोटी रु.चा नफा कमावला.
२०१९-२०२४ मध्ये कंपनीने केवळ भारतातून ५ हजार कोटी रु.चा नफा कमावला. ग्राहकांकडून यूपीआय व बँकांमार्फत पैसा घेतला जात होता.
हा पैसा डमी अकाउंटमार्फत परदेशात गुंतवणूक म्हणून दाखवला जायचा.
आर्थिक व्यवहारांचे जाळे
ऑक्टाएफएक्सची मार्केटिंग टीम ब्रिटिश व्हर्जिन बेटांवरून काम करते. स्पेनमधून सर्व्हर व बॅक ऑफिस ऑपरेशन चालतात. इस्टोनियातून पेमेंट गेटवे चालवला जातो. जॉर्जियातून तांत्रिक साहाय्य मिळते. भारतीयांचा पैसा सायप्रसमध्ये जमा केला जातो. दुबईतून काही भारतीय व्यवहार सांभाळले जातात. सिंगापूरमधून आयातीसंदर्भात बोगस सेवा दिली जाते.
पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा.