शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमांनी सिगरेटचे चटके दिले, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 20:18 IST

दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्दे "तिच्यावर बलात्कार केल्यावर आरोपींनी तिच्या शरीरावर सिगारेटने जखमा केल्या आहेत," मुलीच्या वडिलांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.मुख्य आरोपी अर्जुन नावाचा एक माणूस असून तो घटनास्थळाजवळील खेड्यात राहतो. त्याचा साथीदार छोटू यालाही अटक करण्यात आली आहे," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गोरखपूर - पूर्व उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीवर दोन पुरुषांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या शरीरावर सिगारेटचे चटके  सुद्धा दिसत होते. दुसर्‍या दिवशी ही मुलगी तिच्या आई-वडिलांना ती सापडली. आई - वडील हे वीटभट्टी कामगार आहे. दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गोरखपूरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस अद्याप मुलीच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत आणि मुलीच्या शरीरावर झालेल्या जखम सिगरेटच्या चटक्याच्या जखमा आहेत की नाही यावर डॉक्टरच माहिती देऊ शकतात.ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत पोलिस अधिकारी विपुल श्रीवास्तव म्हणाले की, दोन जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर बलात्कार  आणि पॉक्सो कायद्यासह कायद्याच्या गंभीर कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अर्जुन नावाचा एक माणूस असून तो घटनास्थळाजवळील खेड्यात राहतो. त्याचा साथीदार छोटू यालाही अटक करण्यात आली आहे," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत मुलीच्या आईने सांगितले की, मुलगी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास जेव्हा ती गावात एका हातपंपावर पाणी घेण्यासाठी गेली होती तेव्हा ती घरातून बेपत्ता झाली होती. दुसर्‍या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास कुटुंबाने शोध सुरु केला आणि मुलगी सापडली. "माझ्या मुलीने मला सांगितले की, आरोपींनी तिचे अपहरण केले, तिच्यावर रात्रभर बलात्कार केला आणि नंतर सिगारेटचे चटके देऊन तिचे शरीर जाळले. त्यामुळे माझी मुलगी प्रकृती खराब आहे," असे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे."तिच्यावर बलात्कार केल्यावर आरोपींनी तिच्या शरीरावर सिगारेटने जखमा केल्या आहेत," मुलीच्या वडिलांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. दरम्यान, या तपासाबरोबरच गोरखपूरचे पोलीस प्रमुख सुनील गुप्ता यांची रविवारी रात्री उत्तर प्रदेशातील अन्य सहा जिल्ह्यांतील पोलिस प्रमुखांसह बदली करण्यात आली. 

 

तसेच उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. येथील लखीमपूर खीरी जिल्ह्यात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शनिवारी ऊसाच्या शेतात या मुलीचे मृतदेह पोलिसांना सापडले. राज्यातील मागील काही दिवसांतील ही दुसरी भयानक घटना आहे. या प्रकरणी गावातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुलीची गळा दाबून हत्या केली, तिचे डोळे फोडले आणि जीभही कापल्याचा दावा पिडीत मुलीच्या वडीलांनी केला. शुक्रवारी ही घटना घडली. लखनौपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव नेपाळ सीमेनजीक आहे. तिचा मृतदेह एका आरोपिच्या शेतात सापडला. रविवारी मुलीच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आला आणि त्यात डोळे फोडल्याचा किंवा जीभ कापली नसल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. शवविच्छेदन अहवालातून बलात्कार आणि गळा आवळण्याचं स्पष्ट होत आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

धक्कादायक! वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये चार युवकांचा समावेश

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक