Live-in Partner murder Latest News: इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. संवाद वाढला. मैत्री झाली आणि नंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ती पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक, तर तो सीआरपीएफमध्ये जवान. २०२१ पासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. तो सुट्टीवर आला आणि एका रात्रीत सगळं उद्ध्वस्त झालं. त्याने तिचा गळा दाबला. जीव जाईपर्यंत त्याने तिला सोडलं नाही. रात्री तिची हत्या करून ज्या पोलीस ठाण्यात ती कार्यरत होती, तिथेच तो शरण गेला. तिथे जाऊन त्याने पोलिसांना जे सांगितलं, त्याने सगळेच हादरून गेले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात. सहाय्यक पोलीस असलेल्या महिलेची तिच्या प्रियकराने गळा दाबून हत्या केली. अरुणाबेन नटूभाई जादव असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, तर दिलीप डांगचिया असे आरोपीचे नाव आहे.
वाचा >>२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
दिलीप डांगचिया हा केंद्रीय राखीव पोलीस दलात असून, तो सध्या मणिपूरमध्ये ड्युटीवर आहे. तो सध्या सुट्टीवर आला होता.
अरुणा आणि दिलीप कसे आणि कधी भेटले होते?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणा या कच्छ जिल्ह्यात असलेल्या अंजार पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. तर दिलीप सीआरपीएफमध्ये. अरुणा मूळची सुरेंद्रनगरची रहिवासी होती. सध्या ती अंजारमधील गंगोत्री सोसायटी २ मध्ये राहत होती. सीआरपीएफ जवान दिलीप हा अरुणाच्याच गावात राहतो.
२५ वर्षीय अरुणा आणि दिलीप यांच्यात इन्स्टाग्राममुळे संवाद सुरू झाला. २०२१ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये आले. तेव्हापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघे लग्नही करणार होते.
राग अनावर झाला अन्...
दिलीप आणि अरुणा शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमध्ये होते. रात्री दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये वाद नेमका कशावरून झाला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, भांडण सुरु असताना दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. अरुणाने शिवीगाळ केल्याने दिलीपला राग आला. रागाच्या भरातच त्याने तिचा गळा आवळला.
दिलीपने गळा दाबल्याने अरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. रात्री तिची हत्या केल्यानंतर दिलीप सकाळी अरुणा ज्या पोलीस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे, तिथे गेला. त्यानंतर त्याने अरुणाच्या हत्येची कबूल दिली. त्याने सांगितलेली घटना ऐकून पोलिसही हादरले.