खामल्यातील तरुणावर गुंडाचा प्राणघातक हल्ला, तरुण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 12:46 AM2020-08-30T00:46:52+5:302020-08-30T00:47:14+5:30

 प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खामला वस्तीत गुंडांकडून नेहमीच हैदोस घातला जातो.

criminals attack on a young man in Nagpur, young man seriously injured | खामल्यातील तरुणावर गुंडाचा प्राणघातक हल्ला, तरुण गंभीर जखमी 

खामल्यातील तरुणावर गुंडाचा प्राणघातक हल्ला, तरुण गंभीर जखमी 

Next

नागपूर - खामल्यातील गुंडांनी रोहित गोलानी नामक तरुणावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

 प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खामला वस्तीत गुंडांकडून नेहमीच हैदोस घातला जातो. हे गुंड एमडी आणि अन्य अंमली पदार्थांच्या तस्करीत आणि जुगारात गुंतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते गोलानी कुटुंबाच्या मागे लागले होते. पोलिसांकडे माहिती देत असल्याचा गुंडांना संशय होता. या संशयावरून यापूर्वीही या गुंडांनी गोलानी व त्याच्या आईला मारहाण केली होती. मात्र पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निर्ढावलेल्या गुंडांनी शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास रोहित गोलानी याला भररस्त्यावर गाठून लोखंडी रॉड आणि शस्त्राने अमानुष मारहाण केली.

त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. विशेष म्हणजे त्याची आई मुलाचा जीव वाचावा म्हणून आरोपींच्या हातपाय जोडत होती. मदतीसाठी आरडाओरड करीत होती. मात्र गुंडाच्या धाकामुळे कोणीही मायलेकाच्या मदतीला धावले नाही. रोहित गोलानी याला गंभीर अवस्थेत रस्त्यावर सोडून आरोपी पळून गेले. त्याच्या आईने आजूबाजूच्यांना हात पाय जोडून मदत मागितली आणि मध्यरात्री मुलाला रुग्णालयात पोहोचवले. त्याची प्रकृती गंभीर आहे. माहिती कळल्यानंतर प्रतापनगर पोलीस तेथे पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे स्पष्ट झाली नव्हती.

Web Title: criminals attack on a young man in Nagpur, young man seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.