शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

बॅँकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा फरारी गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 3:37 PM

विविध बँकेमध्ये व फायनान्स कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे करुन सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे़.

ठळक मुद्देसव्वा कोटींची फसवणूक : ७ वर्षे होता फरार

पुणे : विविध बँकेमध्ये व फायनान्स कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे करुन सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे़. बिपिन मुरलीधर पाटील (वय ३८, रा़ अमित ब्ल्युमफिल्ड सोसायटी, नऱ्हे, आंबेगाव) असे त्याचे नाव आहे़. गेल्या ७ वर्षांपासून तो फरारी होता़. गुन्हे शाखेकडून पुणे शहरातील फरार आरोपींच्या शोधासाठी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची स्थापना केली आहे़. या पथकातील पोलीस नाईक महेश निंबाळकर यांना बिपिन पाटील हा घरी येणार असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार महेश निंबाळकर व सहायक फौजदार संभाजी नाईक यांनी त्याला घरातून ताब्यात घेतले़. बिपिन पाटील याने साथीदारांच्या मदतीने युनियन बँकेच्या काळेवाडी शाखेत गृहकर्जाची मागणी केली होती़. बनावट कागदपत्रे सादर करुन बिल्डरच्या नावाने प्रेरणा बँकेत बनावट खाते उघडले व त्यात कर्जापोटी मंजूर केलेला २३ लाख ५० हजार रुपये जमा करुन ते काढून घेऊन फसवणूक केली होती़. याप्रकरणातील संदीप वामनराव क्षीरसागर याला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती़. इतर तिघे फरार झाले होते़. बिपिन पाटील हा सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता़. पोलिसांनी पकडल्यावर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत़. वास्तू फायनान्स यांना ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ३ गुन्हे डेक्कन पोलिसांकडे दाखल आहेत़. विजया बँकेस ३३ लाख रुपयांची फसवणूक तसेच फस्ट ब्ल्यु होम फायनान्स यांना ३३ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश निंबाळकर व सहायक फौजदार संभाजी नाईक, हवालदार महेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली़. ़़़़़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटक