शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृह परिसरातून पळालेला गुन्हेगार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:43 IST

गिट्टीखदानमध्ये पकडला : पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्वास

ठळक मुद्दे आरोपी साईमन केवळ १८ वर्षांचा आहे. मात्र तो सराईत गुन्हेगार आहे. त्याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली होती.या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अजनीचे ठाणेदार प्रदीप रायनावार यांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच जिल्हा पोलीसांना ही माहिती दिली.

नागपूर : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कारागृह परिसरातून पळून गेलेला अट्टल गुन्हेगार साईमन फ्रॉन्सिस अँथोनी याच्या रविवारी रात्री पोलिसांनी मुसक्या बांधल्या.  गिट्टीखदान  परिसरात तो एका नातेवाईकाकडे लपून बसला होता. 

आरोपी साईमन केवळ १८ वर्षांचा आहे. मात्र तो सराईत गुन्हेगार आहे. त्याला अजनी पोलिसांनी २७ ऑगस्टला दुचाकी चोरीच्या आरोपात अटक केली होती. २८ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याचा पोलिस कस्टडी रिमांड मिळवला होता. रिमांड संपल्यामुळे त्याला पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात  रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे रविवारी सायंकाळी ६.१५ ला अजनी पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, पोलीस गाफील असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली. तो पळत असल्याचे पाहून अजनी तसेच कारागृह पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र तो गल्लीतून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. अजनीचे ठाणेदार प्रदीप रायनावार यांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच जिल्हा पोलीसांना ही माहिती दिली. त्यामुळे शहरातील सर्व ठाण्यातील पोलिस पथके आरोपीचा वेगवेगळ्या भागात शोध घेऊ लागले.खबर्‍याने दिली टीपरात्री  पोलिसांनी गुन्हा दाखल करून खबऱ्यांना कामी लावले. आरोपी साईमनचे नातेवाईक गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. तिकडे तो दिसल्याची टीप खबऱ्याने दिली. ते कळताच पोलिसांचा ताफा तिकडे धावला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने साइमनच्या नातेवाईकाकडे जाऊन रात्री ११.३० च्या सुमारास त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला मध्यरात्री पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पळून गेलेला आरोपी सापडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलिसांवरचे संकट टळलेया घटनेमुळे पोलिसांवर मोठे दडपण आले होते. साईमनला कारागृहात नेणाऱ्या पोलिसांना  निलंबनाच्या कारवाईचा धाक वाटत होता.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

 

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता

 

Coronavirus : सहा दिवसांत दुसरा पोलीस ठरला कोरोनाचा बळी; गमावले तीन योद्धे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिसjailतुरुंग