The crime was filed on four people In the pimpri | पिंपरीत हातात तलवारी घेवून गोंधळ घालणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल  
पिंपरीत हातात तलवारी घेवून गोंधळ घालणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल  

 पिंपरी : हातात तलवारी घेवून मोठमोठ्याने आरडाओरडा करीत गोंधळ घालणाऱ्या चौघांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यापैकी दोघांना अटक केली आहे. निखिल साहेबराव साठे (वय २५, रा. घर नं. ४, पत्राशेड, दळवीनगर, निगडी), राजेश रामु लष्करे (वय २०, राजनगर, ओटास्किम, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे असून लखन कैलास सातव, शिवा कसबे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास निगडी, ओटास्कीम येथील पीसीएमसी कॉलनीतील साईबाबा मंदिरासमोरील सहा नंबरच्या बिल्डिंगजवळ आरोपी दोन तलवारी घेवून उभे असून ते मोठमोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Web Title: The crime was filed on four people In the pimpri
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.