Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:51 IST2025-05-15T18:48:28+5:302025-05-15T18:51:07+5:30

Crime News Latest: २००७ मधील हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशाची दोन्ही मुले आणि सूनेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

Crime: Two sons and daughter-in-law of a retired judge sentenced to life imprisonment; What about the 2007 case? | Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?

Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?

Court news in Marathi: कानपूर देहात जिल्हा सत्र न्यायालयाने एका निवृत्त न्यायाधीशाच्या मुलांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशाचे आणि त्यांच्या पत्नीचेही नाव होते. २००७ मधील हत्या प्रकरणात बुधवारी (१४ मे) न्यायालयाने हा निकाल दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सेवानिवृत्त न्यायाधीश शिवबरण सिंह यांच्यासह कुटुंबातील पाच जणांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. मागील आठवड्यात न्यायालयाने शिवबरण सिंह यांची पत्नी नीलम देवी आणि दोन मुले जयवर्धन सिंह आणि यशोवर्धन सिंह आणि जयवर्धनची पत्नी शीलू सिंह यांना दोषी ठरवले. 

न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. बुधवारी हा निकाल सुनावण्यात आला. 

हत्या प्रकरणात सेवानिवृत्त न्यायाधीशाचेही होते नाव

सेवा निवृत्त न्यायाधीश शिवबरण सिंह यांची पत्नी नीलम देवी यांचेही या प्रकरणात होते. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालेला होता. पण, २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विवेक कुमार त्रिपाठी यांनी सांगितले.  

वाचा >>काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान

निकाल देण्यापूर्वी आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे कोर्टासमोर हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

हत्या प्रकरण काय?

त्रिपाठी यांनी सांगितले की, एप्रिल २००७ मध्ये पाच जणांविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. निवृत्त न्यायाधीश शिवबरण सिंह, त्यांची पत्नी नीलम देवी, त्यांचे दोन मुले आणि सून यांची नावे एफआरआयमध्ये होती. जमिनीच्या वादातून त्यांनी नातेवाईक वीरेंद्र सिंह यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या मुलाला जखमी केले होते. 

बेहटा बुजुर्गा येथील जमिनीच्या वादातून केलेल्या या हल्ल्यात वीरेंद्र यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. 

Web Title: Crime: Two sons and daughter-in-law of a retired judge sentenced to life imprisonment; What about the 2007 case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.