Crime: ठाण्यात सेक्स रॅकेट; महिला दलालास अटक, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 10:16 IST2022-11-18T10:14:49+5:302022-11-18T10:16:28+5:30

Sex racket : पैशाच्या आमिषाने काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी गुरुवारी दिली.

Crime: Sex racket in Thane; Female broker arrested, Thane Crime Investigation Department action | Crime: ठाण्यात सेक्स रॅकेट; महिला दलालास अटक, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Crime: ठाण्यात सेक्स रॅकेट; महिला दलालास अटक, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठाणे : पैशाच्या आमिषाने काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिला दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी गुरुवारी दिली. तिच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुली तसेच एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.

ठाणे शहर परिसरात तसेच वेगवेगळया ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून असहाय्य तसेच गरीब महिलांना फूस लावून शरीरविक्रयासाठी काही दलाल महिलांकडून भाग पाडले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे छापा टाकला. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  जमादार  श्रध्दा कदम यांच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या कोपरीतील मीना लंच होम, गांवदेवी मंदिराजवळ बनावट ग्राहक पाठवून पोलीस पथकाने छापा टाकला. याच छाप्यात एका महिला दलालास पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Crime: Sex racket in Thane; Female broker arrested, Thane Crime Investigation Department action