शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार, हिंजवडीच्या तत्कालीन तलाठ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 20:43 IST

तब्बल तेरा वर्षांनंतरही निर्णय दिला नसल्याने संबंधीतांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिंजवडी : कायदेशीर बाबींची पूर्तता करून विकत घेतलेल्या भुखंडाची सातबारा नोंद करण्याचे तहसीलदारांनी आदेश दिले असतानाही, हिंजवडीचे तत्कालीन गावतलाठी आणि पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार यांनी संगनमत करून विरोधात निकाल देऊन मिळकत त्रयस्थ व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केली. या निकालाविरोधात अपील करुनसुद्धा तब्बल तेरा वर्षांनंतरही निर्णय दिला नसल्याने संबंधीतांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी शशिकांत विश्वनाथ भोसले (वय ५३, रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यशवंत बापू सावंत (रा. भोईर कॉलनी, चिंचवड), स. न. खिरीड (तत्कालीन गावकामगार तलाठी, हिंजवडी) तसेच एन. बी. धनगर (तत्कालीन नायब तहसीलदार, पौड) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी भोसले यांनी १९९७ मध्ये हिंजवडी येथे सर्व्हे क्रमांक ६.७५ गुंठे इतके क्षेत्र कायदेशीर बाबींची पूर्तता करून खरेदी केले होते. त्याची सातबारा उताºयावर नोंद घेण्याबाबत पौडचे तत्कालीन तहसीलदारांनी आदेश दिले होते. असे असतानाही आरोपी यांनी आपापसात संगनमत करून सातबारा नोंद न करता राहूल वाघमारे नामक व्यक्तीने हरकत घेतली असल्याचे सांगितले. वाघमारे यांच्या पूर्वीच्या अर्जावर खाडाखोड करून त्या आधारे पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार एन. बी. धनगर यांनी चौकशी करून आरोपी यशवंत सावंत यांच्या बाजूने निर्णय देऊन फियार्दी भोसले यांनी खरेदी केलेली मिळकत आरोपी यशवंत सावंत यांच्या नावावर संगनमताने हस्तांतरित केली. नायब तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णया विरोधात फियार्दीने अपील करूनसुद्धा १३ वर्षांनंतरही त्यावर निर्णय दिला नाही. त्यामुळे भोसले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिमंडळ दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते तपास करत आहेत.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा