किरकोळ कारणावरुन तरुणाला केलेल्या मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 16:32 IST2019-03-21T16:22:25+5:302019-03-21T16:32:08+5:30

किरकोळ कारणावरुन टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

crime registred against Six people for beaten to youth | किरकोळ कारणावरुन तरुणाला केलेल्या मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल  

किरकोळ कारणावरुन तरुणाला केलेल्या मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल  

पिंपरी : किरकोळ कारणावरुन टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल श्रॉफ (वय २७), विशाल मोटवानी (वय ३१), जयकुमार कुकरेजा (वय २७), मयुर तोतलानी (वय ३०), जय नेबवानी (वय २८) यांच्यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कल्पेश कमलेश देवाणी (वय २२, रा. पद्म को आॅपरेटीव्ह सोसायटी, बिल्डिंग नं. १, जयहिंद शाळेसमोर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे भाऊ जय देवाणी, अविनाश देवाणी, भरत देवाणी यांच्यासह दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी अचानक एक मोटार भरधाव वेगात आल्याने त्यांनी दुचाकी थांबविल्या. या मोटारीत बसलेला आरोपी अनिल श्रॉफ फियार्दीला म्हणाला की, तुम गाडी फास्ट चला रहे हो, गाडी धीरे चलाओ त्यावर फिर्यादी हो म्हणून घरी जाण्यास निघाले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच फोन करुन विशाल मोटवानी, जयकुमार कुकरेजा, मयुर तोतलानी, जय नेबवानी यांना बोलावून घेतले. त्यानंतर श्रॉफ याने कल्पेश देवाणी यांना हाताने, काठीने मारहाण करीत सिमेंटचा गट्टू डोक्यात मारला. तर अविनाश देवाणी यांनाही हातावर, पायावर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: crime registred against Six people for beaten to youth