crime registred against 'ncp' activists due to problem in CM's speech | मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळा आणणाऱ्या '''राष्ट्रवादी '' च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळा आणणाऱ्या '''राष्ट्रवादी '' च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 

ठळक मुद्देशहराध्यक्षासह पाच ते सहा कार्यकर्त्यां विरोधात तक्रार 

बारामती : शहरात नुकत्याच पार पडलेल्या  भाजपच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या भाषण अडथळा आणुन घोषणाबाजी केल्याप्रकरणी  बारामती शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांसह पाच ते सहा कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ओंकार कैलास सिताप यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार  बारामती शहरचे राष्टवादी काँग्रेस युवक पार्टी अध्यक्ष अमर धुमाळ, सागर खलाटे ( दोघे रा.बारामती ता बारामती जि.पुणे) यांच्यासह तसेच राष्टवादी कॉंग्रेस युवक पक्षाचे पाच ते सहा अनोळखी कार्येकर्त्यांवर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवली. मुख्यमंत्र्यांचे  भाषण सुरु असताना त्यांचे भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्या उददेशाने एकच वादा अजित दादा अशा मोठमोठयाने घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे फियार्दीमध्ये नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार  करीत आहेत.
 दरम्यान शनिवारी(दि १४) पार पडलेल्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सकाळपासुनच तणावाचे वातारवरण होते. डिजे साऊंड सिस्टिम वरून देखील राष्ट्रवादीच्या आणि भाजपमध्ये वाद झाला. यावेळी महाजनादेश यात्रेसाठी लावलेली  डीजे साऊंड सिस्टिम बंद करण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना भाग पाडले होते. तसेच,  मुख्यमंत्र्यांचा प्रवेश बारामती एमआयडीसीसह शहरात होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत मुख्यमंत्र्यांचा  निषेध व्यक्त केला. कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला , एकच वादा अजित दादा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. तसेच शहरात देखील भाषण सुरु असताना  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत अडथळा आणला होता. त्यामुळे  शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.तसेच  मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेत हम मोदीजी के बाशिंदे है,हमारी आवाज कोई बंद नही कर सकता,अशा शब्दात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिले होते.शिवाय रविवारी(दि १५)  पुणे शहरात झालेल्या पत्रकार परीषदेत बारामतीत ३७० कलम लागू केले की काय, असा सवाल केला होता.अखेर याप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——————————————————

Web Title: crime registred against 'ncp' activists due to problem in CM's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.