नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 19:56 IST2019-09-20T19:54:22+5:302019-09-20T19:56:33+5:30
तुझ्या आई वडिलांकडून मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये, नाही तर आम्ही तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करू असे म्हणून शिवीगाळ, मारहाण के

नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल
तळेगाव दाभाडे : शारीरिक व मानसिक छळ करून नवविवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल पती,सासू,दीर यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने गुरुवारी (दि.१९) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पती व दीर यांना अटक करण्यात आली आहे.पती चेतन शशिकांत केदारी,सासूसुनंदा शशिकांत केदारी, दीर नरेंद्र शशिकांत केदारी, जाव हर्षली नरेंद्र केदारी (सर्व रा. चिंतामणी आपार्टमेंट ,वराळे,ता.मावळ ,मूळ रा. बामनोद ता. यावल जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात मृत मुलीच्या आईने गुरुवारी (दि.१९) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१८ पासून ते २९ जून २०१९ या कालावधीत माझ्या १९ वर्षीय मुलीचा नांदताना सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. भिकाऱ्याच्या घरच्या पोरीशी लग्न केले आहे. लग्नात दिलेल्या भेटवस्तू फार कमी दिल्या आहेत.तुझ्या आई वडिलांकडून मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये घेऊन ये, नाही तर आम्ही तुझ्या नवऱ्याचे दुसरे लग्न करू असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ करून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
याप्रकरणी पती चेतन केदारी(वय २५) व दीर नरेंद्र केदारी(वय ३२)यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी यांनी दिली.