Video - पती झाला हैवान! मित्राकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला शिक्षा, 7 तास झाडाला बांधलं, मारलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:25 IST2022-07-30T17:21:28+5:302022-07-30T17:25:46+5:30

Crime News : सोशल मीडियावर या भयंकर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पतीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Crime News women tied on tree for seven hours and brutally beaten by her husband in banswada | Video - पती झाला हैवान! मित्राकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला शिक्षा, 7 तास झाडाला बांधलं, मारलं अन्...

Video - पती झाला हैवान! मित्राकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला शिक्षा, 7 तास झाडाला बांधलं, मारलं अन्...

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पतीने पत्नीला भयंकर शिक्षा दिली. एका मित्राकडून लिफ्ट घेतली म्हणून पतीने महिलेला 7 तास झाडाला बांधून ठेवलं आणि बेदम मारलं आहे. राजस्थानच्या बांसवाडामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून मारहाणीचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पत्नीला काठीने जबर मारहाणही केली. एका मित्राकडून लिफ्ट घेतली म्हणून पती संतापला आणि त्याने पत्नी आणि मित्राला झाला बांधून ठेवलं. 

सोशल मीडियावर या भयंकर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पतीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बांसवाडाच्या घाटोल सर्कल येथील आहे. व्हिडीओमध्ये एका तरुण आणि तरुणीला झाडाला बांधून मारहाण करत असल्याचे दिसत आहे. अनेक जण अमानुषपणे या दोघांना मारहाण करत असल्याचे या व्हिडीओत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. 

सुमारे दोनच्या सुमारास पती-पत्नीला शोधून काढण्यात आले. पीडित महिलेने रात्री एफआयआर दाखल केली. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. केवळ दुसऱ्या तरुणाने लिफ्ट दिली म्हणून केलेली ही शिक्षा पाहून तेही हैराण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची सासूरवाडी हेरो गावात आहे. ही महिला काही कामानिमित्ताने शुक्रवारी घाटोल बाजारात गेली होती. याच दरम्यान तिला मित्र देवीलाल मईडा भेटला. महिलेने देवीलालला मावस सासूच्या घरी मुडासेलला सोडण्याची विनंती केली. महिला आणि देवीलाल हे मावस सासूच्या घरी पोहचल्यानंतर तिथे वेगळेच घडले. 

मावस सासू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संशयाच्या आधारावर या दोघांना बांधून ठेवलं. तिच्या पतीला बोलावण्यात आलं. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, पती महावीर, दीर कमलेश, भावजय सुंका आणि मामे सासऱ्यांनी काठी आणि बुटांनी मारहाण केली. या महिलेला सात तास झाडाला बांधून ठेवण्यात आले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News women tied on tree for seven hours and brutally beaten by her husband in banswada