शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! हुंड्यामध्ये कार आणि 5 लाख न दिल्याने सासरचे झाले हैवान; विवाहितेवर 12 जणांकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 17:29 IST

Crime News : तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हुंड्यामध्ये एसयूव्ही कार आणि 5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून सासरची मंडळी हैवान झाली. विवाहितेवर कुटुंबातील 12 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. तरुणीने सामूहिक बलात्कारासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांनी सांगितलं की, जर पतीला हुंड्यात एक एसयूव्ही कार आणि 5 लाख रुपये नाही दिले तर हे सुरूच राहील. तसेच तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. माझ्या आई-वडिलांनी आधीच हुंड्याच्या रुपात बरच काही दिलं होतं."

"काही महिन्यांनंतर माझे पती आणि त्यांच्या कुटुंबाने 5 लाख रुपयांची कॅश आणि एक लग्जरी कारची मागणी केली. मात्र मी याचा विरोध केला. त्यानंतर त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. जेव्हा मी गर्भवती झाली तेव्हा त्यांनी मला गर्भपात करायला जबरदस्ती केली. त्यांनी मला मारहाण सुरू केली. शेवटी मी माहेरी निघून गेली. मात्र सासरची मंडळी माझ्या माहेरी आले व माझं मन बदलून मला सासरी घेऊन गेले. गेल्या आठवड्यात कुटुंबातील व त्यांचे मित्र अशा 12 जणांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला" असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेत. 

भयावह! घरात घुसून नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हतबल भावाने हात जोडून विनवणी केली पण...

राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. झुंझुनं येथील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने 14 वर्षीय मुलीला एका खोलीत बंद केलं. मुलीने खूप आरडाओरडा केला. याच दरम्यान तिचा भाऊ आला. बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भावाने दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला गेला नाही. यानंतर हतबल झालेल्या भावाने हात जोडून बहिणीला सोडण्यासाठी खूप विनवण्या केल्या. पण आरोपीने काहीच ऐकलं नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस