नात्याला काळीमा! 2 मुलांच्या आईचे भाच्यासोबत संबंध; पतीचा अडथळा होताच 'असा' काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 13:01 IST2022-09-15T13:00:27+5:302022-09-15T13:01:22+5:30

Crime News : देवेंद्र आणि नेहा यांना दोन मुलं आहेत. ते 13 महिन्यांपासून वेगळे राहत होते. याच दरम्यान नेहा आणि तिचा भाचा विक्की यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या संबंधांमध्ये देवेंद्र अडथळा ठरत होता.

Crime News woman murder her husband in love with nephew in indore | नात्याला काळीमा! 2 मुलांच्या आईचे भाच्यासोबत संबंध; पतीचा अडथळा होताच 'असा' काढला काटा

नात्याला काळीमा! 2 मुलांच्या आईचे भाच्यासोबत संबंध; पतीचा अडथळा होताच 'असा' काढला काटा

इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात इंदूर पोलिसांना यश आलं आहे. एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संगम नगरमध्ये सोमवारी एका गोणीत तरुणाचा मृतदेह सापडला होता. तरुणाचे हात पाय बांधलेले होते. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या पत्नीला आणि भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत. हत्या झालेल्या तरुणाचं नाव देवेंद्र अग्रवाल होतं. देवेंद्रच्या भावानं त्याचा मृतदेह ओळखला. त्यानंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि भाच्याला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र आणि नेहा यांना दोन मुलं आहेत. ते 13 महिन्यांपासून वेगळे राहत होते. याच दरम्यान नेहा आणि तिचा भाचा विक्की यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या संबंधांमध्ये देवेंद्र अडथळा ठरत होता. त्यामुळे नेहा आणि विक्कीने देवेंद्रचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र सोमवारी पत्नीच्या घरी गेला. 

नेहा आणि विक्कीसोबत त्याचा वाद झाला. याच वेळी दोघांनी देवेंद्रची गळा आवळून हत्या केली. देवेंद्रचा मृतदेह दोघांनी गोणीत भरला. त्यानंतर त्यांनी लोडिंग रिक्षातून मृतदेह रात्री उशिरा संगम नगरातील कासलीवाल येथे आणला. रिकाम्या शेतात त्यांनी मृतदेह फेकून दिला. देवेंद्रचा मृतदेह सापडताच त्याच्या भावानो नेहा आणि विक्कीवर हत्येचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली.

चौकशीतून नेमकं सत्य समोर आलं. दोघांनी हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची माहिती इंदूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जयवीर भदौरिया यांनी दिली. महिलेचे तिच्या भाच्यासोबत अवैध संबंध होते. त्यात पती अडथळा ठरत होता. त्यामुळे तिनं भाच्याच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचं भदौरिया यांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News woman murder her husband in love with nephew in indore