माणुसकीला काळीमा! पती अन् मुलांच्या डोळ्यांदेखत महिलेवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 16:36 IST2022-03-20T16:32:54+5:302022-03-20T16:36:45+5:30

Crime News : विवाहित महिलेवर पती आणि मुलांसमोर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Crime News woman molested in front of husband and children in dholpur | माणुसकीला काळीमा! पती अन् मुलांच्या डोळ्यांदेखत महिलेवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ

माणुसकीला काळीमा! पती अन् मुलांच्या डोळ्यांदेखत महिलेवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेवर पती आणि मुलांसमोर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील ढोलपूर जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये महिलेने सहा जणांविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत शेतातून परतत असताना ही घटना घडली. सहा जणांनी त्यांना अडवलं आणि बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं. आरोपींनी महिलेच्या पतीला मारहाण केली आणि यानंतर सहापैकी दोघांनी मुलांसमोर महिलेवर बलात्कार केला. यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. महिलेची मुलं आपल्या आईची नराधमांच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून रडत होती. ओरडत होती. पण त्याचा काहीच फायदा झाला आहे. 

महिलेने पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, आपल्या पतीलाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, शारीरीक छळ तसेच विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय कुमार सिंह यांनी दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News woman molested in front of husband and children in dholpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.