"माझ्या मृत्यूला पती आणि त्याची प्रेयसीच जबाबदार"; बहिणीला ऑडिओ पाठवून महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 15:08 IST2022-07-18T15:02:09+5:302022-07-18T15:08:24+5:30

Crime News : महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रीना असं या मृत महिलेचं नाव असून ती अहमदाबाद येथील रहिवासी होती.

Crime News woman commits suicide after 5 years of love marriage railway colony ahmedabad | "माझ्या मृत्यूला पती आणि त्याची प्रेयसीच जबाबदार"; बहिणीला ऑडिओ पाठवून महिलेची आत्महत्या

फोटो - दैनिक भास्कर

राजस्थानच्या कोटामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना आता समोर आली आहे. प्रेमविवाह करणाऱ्या एका महिलेने ऑडिओ पाठवून आत्महत्या केली. आत्महत्येआधी तिने ऑडिओ बनवला आणि त्यामध्ये पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत ते आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रीना असं या मृत महिलेचं नाव असून ती अहमदाबाद येथील रहिवासी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रीना हिने पाच वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होतं. तिच्या पतीचे नाव करण सिंह असं आहे. प्रेमविवाहानंतर तिचा पती करण हा तिला मारहाण करायचा. तसेच त्याने याआधी तिला दोन लाखांची मागणीही केली आहे. तसेच पतीच्या दुसऱ्या तरुणींशी असलेल्या संबंधांमुळेही रीना मानसिक तणावात होती. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. तिने तिच्या बहिणीला ऑडिओ पाठवून आणि घरात गळफास लावत आत्महत्या केली. या घटनेनंतर रीनाची कुटुंबीयांनी पती आणि त्याच्या प्रेयसीवर गंभीर आरोप लावत तक्रार दाखल केली आहे.

रीनाची बहीण शालिनीने दिलेल्या माहितीनुसार, 5 वर्षांपूर्वी तिची मोठी बहीण रीना हिने कोटा येथील रहिवासी करण सिंहसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर एकदाही सासरच्यांनी रीनाला माहेरी पाठवले नाही. अनेकवेळा फोन करून रीनाला घरी आणण्यास सांगितले, मात्र, सासरच्यांनी याकडे दुर्लक्ष केले. बहिणीचे म्हणणे आहे की, रीनाने मृत्यूपूर्वी एक ऑडिओ पाठवला. यामध्ये तिने तिच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचे सांगितले होते. तसेच त्याला आता रीनासोबत राहायचे नव्हते आणि पूजा नावाच्या एका तरुणीसोबत त्याला पुढचे आयुष्य जगायचे होते. 

रीना हिचा पती करण सिंह याने तिला अनेकवेळा मारहाण केली होती. तसेच हुंड्यासाठीही तिचा छळ केला. आत्महत्येआधी तिने एक ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवला होता. मात्र रात्र असल्याने सर्व लोक झोपेले होते, सकाळी जेव्हा मोबाईल पाहिला तेव्हा ऑडिओ आलेला दिसला. ज्यामध्ये रीना रडत होती. रीनाने घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे आता तिच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News woman commits suicide after 5 years of love marriage railway colony ahmedabad