Crime News: पती असताना लाडक्या जिजूवर जीव जडला; प्रेमात आंधळ्या मेहुणीने कुंकवाचा घोट घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 10:59 IST2022-03-27T10:58:33+5:302022-03-27T10:59:06+5:30

मारहाण झाल्याचे दिसत होते. यामुळे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला. यानंतर एकेक करून या गुन्ह्यातील कड्या उलगडत गेल्या.

Crime News : Wife murder Husband In love with sisters husband; Incident took place in Aurangabad Bihar | Crime News: पती असताना लाडक्या जिजूवर जीव जडला; प्रेमात आंधळ्या मेहुणीने कुंकवाचा घोट घेतला

Crime News: पती असताना लाडक्या जिजूवर जीव जडला; प्रेमात आंधळ्या मेहुणीने कुंकवाचा घोट घेतला

औरंगाबाद : बहीणीच्या नवऱ्यावरील प्रेमापायी पतीचा जीव घेतल्याचा खळबळनक प्रकार बिहारच्या औरंगाबादमध्ये घडला आहे. लाडक्या जिजूसोबत मिळून मेहुणीने पतीचाच काटा काढला आहे. त्याला लाठ्या काठ्यांनी एवढे पिटले की त्याचा जागीत जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. 

नवीननगर जिल्ह्याच्या चंद्रगढमधील ही घटना आहे. पोलिसांनुसार संध्या देवीने तिचा पती धनंजयची हत्या तेली आहे. बहीणीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याने पतीला वाटेतून हटविण्यासाठी तिने तीन जणांच्या साथीने ही हत्या केली आहे. पती तिच्या प्रेमसंबंधांत आड येत होता. एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, २१ मार्चला गोपाल यादव यांनी एफआयआर दाखल केला होता. यामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा धनंजय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. 

मारहाण झाल्याचे दिसत होते. यामुळे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला. यानंतर एकेक करून या गुन्ह्यातील कड्या उलगडत गेल्या. लल्लू यादव नाव असलेल्या जिजूसोबत संध्याचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना समजले. धनंजय यादवच्या हत्येमागे त्याच्याच पत्नीचा हात असल्याचे तपासात समोर आले. 

यासाठी तिने जिजू आणि अन्य दोन व्यक्तींची मदत घेतली होती. पतीला हॉकी स्टीकने मारहाण करण्यात आली. ही हॉकी स्टीक, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

Web Title: Crime News : Wife murder Husband In love with sisters husband; Incident took place in Aurangabad Bihar