Crime News: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून, डोके, गुप्तांगावर केले वार, जीव जाईना म्हणून डोक्यात घातला दगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 22:11 IST2022-05-16T22:04:24+5:302022-05-16T22:11:20+5:30
Crime News: नांदगाव पैकी मांगुरवाडी ( ता. शाहूवाडी) येथे अनैतिक संबधात अडथळा ठरणारया पती प्रकाश पांडुरंग कांबळे वय ५२ याचा पत्नी वंदना प्रकाश कांबळे वय ५० हिने धारदार चाकूने वार करून व डोक्यात दगड घालुन खुन केला आहे.

Crime News: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून, डोके, गुप्तांगावर केले वार, जीव जाईना म्हणून डोक्यात घातला दगड
मलकापूर - नांदगाव पैकी मांगुरवाडी ( ता. शाहूवाडी) येथे अनैतिक संबधात अडथळा ठरणारया पती प्रकाश पांडुरंग कांबळे वय ५२ याचा पत्नी वंदना प्रकाश कांबळे वय ५० हिने धारदार चाकूने वार करून व डोक्यात दगड घालुन खुन केला आहे. ही घटना रविवार दि १५ मे रोजी मध्य रात्री घडली आहे. पत्नी वंदना कांबळे हीला शाहूवाडी पोलीसांनी अटक केली आहे. याची नोंद शाहू वाडी पोलीसात झाली आहे.
पोलीसातुन मिळालेली महिती अशी शाहूवाडी तालुक्याती ल लोळाणे येथील प्रकाश कांबळे आपल्या कुंटुबासह सज्जन पाटील यांच्या नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे शेतात कामाला होता. प्रकाश कांबळे याला दारुचे व्यसून होते . पत्नीचे बाहेर अनेतिक संबधावरून दररोज पती व पत्नी मध्ये वाद होत होता.
रविवार दि १५ मे रोजी मध्य रात्री याच कारणा वरून पती पत्नी मध्ये वाद झाला. प्रकाश यांने पत्नी वंदना हीला शिवीगाळ करू लागला होता. दोघाचे कडाक्याचे भांडण सुरू असताना अचानक पत्नी वंदना हिने धारदार चाकूने प्रकाशच्या डोक्यात वार करून त्याच्या गुप्तांगांवर वार केले. मयत प्रकाश याचा प्राण जाईना म्हणून डोक्यात दगड घातला व दोरीने गळा आवळून खुन केला. सोमवार दि १६ मे रोजी वंदना कांबळे हीने शाहूवाडी पोलीसात माझ्या पतीने आत्महत्या केल्याची फीर्याद दाखल केली. पोलीसांनी नांदगाव येथे जाऊन घटनेचा पंचनामा करून मतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी दाखल केला.
वैधकीय अधिकारी मयताचे शवविच्छेदन करीत असताना मयताच्या अंगावर व गुप्तागांवर चाकूचे वार दिसले ' डोक्यात गंभीर जखम झाली होती . वेधकीय अधिकारयाणी पोलीसांना घटनेची कल्पना देताच पत्नी वंदना जवळ चोकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी पोलीस खाक्या दाखविताच पत्नीने गुन्हयाची कबुली दिली.