Crime News: नातेवाइकांबरोबर नाचली म्हणून पत्नीची केली हत्या, पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:21 IST2021-10-13T13:21:15+5:302021-10-13T13:21:41+5:30

Crime News: सहलीला गेल्यानंतर दोघा पुरुष नातेवाईकांबरोबर नाचल्याचा राग आणि डोक्यातील संशयाचे भूत यातून बंगळुरूमधील एका ४० वर्षीय सावकाराने आपल्या पत्नीची हत्याच केली.

Crime News: Wife killed for dancing with relatives, screw driver stabbed in the stomach | Crime News: नातेवाइकांबरोबर नाचली म्हणून पत्नीची केली हत्या, पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर आणि मग...

Crime News: नातेवाइकांबरोबर नाचली म्हणून पत्नीची केली हत्या, पोटात खुपसला स्क्रू ड्रायव्हर आणि मग...

बंगळुरू : सहलीला गेल्यानंतर दोघा पुरुष नातेवाईकांबरोबर नाचल्याचा राग आणि डोक्यातील संशयाचे भूत यातून बंगळुरूमधील एका ४० वर्षीय सावकाराने आपल्या पत्नीची हत्याच केली. हत्येनंतर तो फरार झाला. बंगळुरूच्या बी. आर. कांताराजू असे आरोपीचे नाव आहे. आपल्याच दोन नातेवाईकांशी पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा त्याला संशय होता. हे दांपत्य काही नातेवाईकांसह चिक्कबंगळुरू आणि आसपासच्या भागांत तीन दिवसांच्या सहलीला गेले होते. तिथे गाण्याच्या तालावर सर्वच जण नाचत होते. कांताराजूची पत्नी रूपा हीदेखील त्यात सहभागी झाली. ज्या दोघांशी तिचे संबंध असल्याची शंका त्याला होती, तेही त्यावेळी नाचत होते. त्यामुळे तो मनातून खूपच संतापला.  

संशय होता
सहलीनंतर दाम्पत्य घरी आले आणि कांताराजूने पत्नीशी भांडायला सुरुवात केली. ‘‘तू त्यांच्याबरोबर का नाचत होतीस, त्यांचे आणि तुझे काय संबंध आहेत’’, असे सवाल त्याने केल्याने भांडण वाढले. त्याच रागात त्याने पत्नीच्या पोटात स्क्रू ड्रायव्हर खुपसला. पत्नी रूपा तिथेच कोसळली. तिच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होते.  पण कांताराजूने तिला डॉक्टरांकडे न नेता वा उपचार न करता तेथून पळ काढला.

Web Title: Crime News: Wife killed for dancing with relatives, screw driver stabbed in the stomach